Admissions for Class 11th अकरावी Maharashtra - mumbai.11thadmission.netअकरावी प्रवेशासाठीची माहितीपुस्तिका mumbai.11thadmission.net या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
विद्यार्थी, पालकांसाठी सूचना
■ विद्यार्थी आणि पालकांनी माहितीपुस्तिकेसोबत आलेला लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून वेबसाइटवर प्रोफाइल तयार केलेच असेल. त्यानंतर शक्यतो आपला पासवर्ड बदलून पुढील प्रक्रियांचा विचार करावा.
■ दहावीच्या निकालापूर्वीच्या पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना आपली वैयक्तिक माहिती या अर्जामध्ये नोंदवली होती. त्यासाठी अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बोर्डाच्या विद्यार्थ्यांची माहिती घेतलेली आहे. त्यानुसार विद्यार्थ्याने आपले नाव व दहावीच्या परीक्षेचा क्रमांक संकेतस्थळावर नमूद केल्यानंतर त्याची बहुतांश माहिती प्रक्रियेसाठी उपलब्ध होईल. ही माहिती खातरजमा करून विद्यार्थ्यांनी उर्वरित माहिती भरावी.
■ प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात कॉलेजचे संकेतांक विचारात घेताना, कॉलेजमधील शाखा, प्रकार, गट, माध्यम, उपलब्ध असणारे वैकल्पिक विषय यांचा योग्य तो विचार करावा. त्यानुसार कॉलेजांचे संकेतांक स्वतंत्रपणे नोंदवून कॉलेजांच्या प्राधान्यक्रमांकांची यादी तयार करावी.
■ कॉलेजांची यादी तयार करताना दहावीला मिळालेल्या गुणांची टक्केवारी आणि निवडत असलेल्या कॉलेजांची गेल्या वर्षीची कटऑफ यांचा योग्य तो ताळमेळ साधावा.
■ प्रवेशअर्ज सादर केल्यानंतर त्याची एक छापील प्रत विद्यार्थ्याने स्वतःकडे काढून ठेवावी.
■ ज्या विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक/इन हाऊस/एनएसक्यूएफ/तांत्रिक बायफोकल कोट्यात अलॉटमेंट होईल त्यांनी संबंधित कॉलेजमध्ये जाऊन पूर्ण फी भरून प्रवेश निश्चित करायचे आहेत.
■ कोटा प्रवेशाचे झीरो राऊंड संपल्यावर ऑनलाइन फेरीच्या प्रत्येक आठवड्याला एक अशा चार फेऱ्या व नंतर दर दोन आठवड्याला एक अशा तीन फेऱ्या होतील.
■ यंदा कॉलेजांचे पसंतीक्रम नोंदविण्यासाठी केवळ १० पर्याय नोंदवायचे आहेत.
■ पहिल्या फेरीत पसंतीक्रमाप्रमाणे कॉलेज मिळाल्यास विद्यार्थ्यांनी पूर्ण फी भरून प्रवेश घेणे बंधनकारक आहे.
■ विद्यार्थ्याला दोन ते दहाव्या क्रमांकाच्या पसंतीचे कॉलेज मिळाल्यास प्रवेश घेणे बंधनकारक नाही. विद्यार्थी पुढच्या फेरीत वाट पाहू शकतो, मात्र जर विद्यार्थ्याने फी भरून प्रवेश निश्चित केला तर त्या विद्यार्थ्यांचा पुढील फेऱ्यांसाठी विचार होणार नाही.
0 comments:
Post a Comment