Student Admissions List for Class 11th Started 2017-18 After 10th Admissions for Class 11th Started 2017-18 दहावीची परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आता ‘मिशन अॅडमिशन’च्या महाभारताला विद्यार्थ्यांना सोमोरे जावे लागणार आहे. गेल्यावर्षी प्रमाणे ११वीसाठी एकूण जागा आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने त्याचा फटका अकरावी प्रवेशप्रक्रियेला बसणार आहे. त्यातच यंदाही सीबीएसई आणि आयसीएसई विभागाच्या निकालाची वाढती टक्केवारी, ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रचंड संख्या यामुळे विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजांच्या प्रवेशसाठी तारेवरची कसरतच करावी लागणार आहे. अनेक नामांकित कॉलेजांची कट ऑफ यागी नव्वदपार जाणार असल्याचे प्राचार्यांकडून सांगण्यात येते आहे.
राज्य शिक्षण मंडळातर्फे मंगळवारी दहावी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला असून मुंबई विभागाचा निकाल हा ९०.०९ टक्के लागला आहे. मुंबई विभागातून एकूण ३ लाख ८ हजार ९९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर काही दिवसांपूर्वी शिक्षण उपसंचालकांनी जाहीर केलेल्या अकरावीच्या उपलब्ध जागेनुसार २ लाख ९२ हजार जागा आहेत. मुंबई विभागातून एकूण विद्यार्थ्यांमध्ये रायगड, पालघर आणि इतर काही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने एकूण विद्यार्थ्यांची संख्या थोडी कमी होईल खरी पण प्रवेश प्रक्रियेवर त्याचा थेट परिणाम होणार असल्याची माहिती अनेक प्राचार्यांनी दिली.
सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या जमेस धरल्यास हा आकडा साधारण तीन लाखांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. त्यातच सीबीएसई आणि इतर राज्यांच्या मंडळांचे ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी तारेवरची कसरतच करावी लागणार आहे. यंदा राज्य शिक्षण मंडळाच्या ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या एक हजाराने कमी झाली आहे. सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने राज्यात एसएससीच्या विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळवण्यासाठी झगडावे लागणार आहे. मुंबई आणि उपनगरातील रुईया, पोदार, रुपारेल, साठ्ये, केसी, एचआर, मिठीबाई, कीर्ती आणि हिंदुजा यांसारख्या नामवंत कॉलेजातील प्रवेशासाठी तिन्ही मंडळाच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी चढाओढ असेल.
एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही!
राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निकालाच्या आकडेवारीनंतर अकरावी प्रवेशाच्या जागा कमी असल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. ही शक्यता शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी फेटाळून लावली आहे. मुंबई विभागीय मंडळात रायगड, पालघर जिल्ह्याचा देखील समावेश आहेत.
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक आज
दहावीच्या निकालानंतर आता सर्वांचे लक्ष अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या वेळापत्रकाकडे लागले आहे. त्यानुसार बुधवारी या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली.
0 comments:
Post a Comment